मुख्य बातमी
नवरात्रीनिमित्त वेळणेश्वर बाजारपेठेत आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वयंभू विकास मंडळाच्या वतीने आयोजन

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री स्वयंभू विकास मंडळातर्फे दरवर्षी घटस्थापनेच्या सहाव्या माळेला श्री स्वयंभू दुर्गा स्थापना केली जाते. यानिमित्ताने अनेक सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात. यंदाही लहान मुलांसाठी फनी गेम्स, महिलांसाठी संगीत खुर्ची तसेच तालुकास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात झाली.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये एका स्पर्धकांने धर्मवीर आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारताना त्यांचे चालण्या, बोलण्यातले बारकावे ही सादर केले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या स्पर्धकाला प्रोत्साहित केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या इंट्रीने कार्यक्रमाची रंगतच वाढली होती. ही व्यक्तिरेखा पालशेत येतील अविनाश झिंबर या युवकाने साकारली. यावेळी आयोजित गरबा नृत्यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



