इंडियन स्टुडंट कौन्सिलचे “सावित्रीच्या लेकी” राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

पुणे – इंडियन स्टुडंट कौन्सिल गेल्या पाच वर्षापासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील महिलांना संन्मानित करत आहे.
राजर्षी छ.शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार चिन्मयी सूमित, अनिल कलकुटकी,डॉ.जगन्नाथ गोपाळ,यांना तर या वर्षीच्या राष्ट्रीय सावित्रीच्या लेकी या पुरस्काराच्या मानकरी म्हणून महाराष्ट्रातून सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे, राजकीय क्षेत्रातील मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मुंबई व संशोधन क्षेत्रातील प्रा.डॉ. सरीता मालवीय, मध्यप्रदेश यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराच्या मानकरी संशोधन क्षेत्रातील प्रा. डॉ.अरुणा वाघोले, पत्रकारिता क्षेत्रातील प्राची घाणेकर, साहित्य क्षेत्रातील अस्मिता चांदणे, शिक्षण क्षेत्रातील पल्लवी पुजारी, सामाजिक क्षेत्रातील वैशाली सावळे, करुणा विमल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . तर साऊ-ज्योतिबा आदर्श लेखणी पुरस्कार प्रज्ञा बाली- प्रा.डॉ.नीता समद्दार- प्रा. डॉ. मंजुश्री जाधव,प्रा.डॉ.साधना चटलांनी(संशोधन ) राज्यस्तरीय विशेष सावित्रीच्या लेकी अश्विनी दीक्षित (शैक्षणिक) अंजली कुंदरगी (सांस्कृतिक) सोनिया इथापे (सामाजिक ) गौरी प्रभूणे (शैक्षणिक) यांना व राष्ट्र सेवा दलातील आणि छात्रभारतीत घडलेल्या कार्यकर्त्यांच्या मुली डॉक्टर इंजिनीअर झाल्या आहेत त्यांचा ही सावित्रची लेक म्हणून सन्मान अभिनेत्री सुषमा देशपांडे व कवी व गायक अरुण म्हात्रे या मान्यवरांच्या हस्ते सन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांनी केले प्रास्ताविकेत इंडियन स्टुडंट कौन्सिल गेल्या पाच वर्षापासून केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली व ठरावाचे वाचन केले ते असे मराठी शाळा वाचवण्याचा शासनाने प्रयत्न करावे व मराठी शाळांना अभय द्यावे. महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थांच्या शिष्यवृतीत वाढ करण्यात यावी. एक व्यक्ती एक नोकरीची संधी, एक व्यक्ती एक अक्षणाची संधी हे धोरण सरकारने अंमलात आणावे. माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी होणार्या आवाजावर बंदी घालण्यात यावी. शाळा व महाविदयालयात असलेली रिक्त पदे सरकारने त्वरीत भरावी. व शेवटी साथी पन्नालाल सुराणा व डॉ. बाबा आढाव, आणि अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुरस्काराला उत्तर देताना चिन्मयी सुमित म्हणाल्या की मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण त्या पुरस्कारा पेक्षा हा जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. मी मराठी शाळेसाठी कायम काम करीत राहीन.राष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी विभावरी देशपांडे म्हाणाल्या की सावित्री बाईच्या नावे मला पुरस्कार मिळतोय या साठी मी खूप भाग्यावान आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की सावित्रीबाई मुळे आम्हाला राजकारणात संध्या मिळाल्या. तर राज्यस्तरीय ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराच्या मानकरी प्राची घाणेकर यांनी आम्ही सावित्रीच्या विचाराचा वारसा चालऊ कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती सुषमा देशपांडे यांनी काळानुसार सावित्रीबाई फुलेंच्या प्रयोगाची खूप गरज आहे. असे मौलिक मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी अरुण म्हात्रे यांनी उंच माझा झोकाचे शीर्षक गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या यशवतेसाठी प्रा. माधुरी राऊत,डॉ. माधवी माहके,प्रा. आरती खातू, प्रा. कल्पना सिद्धेवाड ,सारिका शिंदे ,सुवर्णा शिंदे ,क्रांती दामा, प्रा. डॉ. धनाजी थोरे,डॉ.रोहित गायकवाड, श्रीमती ममता बार्डोले परिश्रम घेतले.



