संगमेश्वर नवनिर्माण कॉलेजमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा
हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे आयोजन

संगमेश्वर : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित संगमेश्वर येथील नवनिर्माण कॉलेजमध्ये येथे ४ सप्टेंबर रोजी गणेश उत्सव उत्साहात साजरा झाला.
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील नवनिर्माण कॉलेजमध्ये गणेशोत्सव उत्साहात पार पडला. कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असणारी आपली कोकण रेल्वेचा देखावा यावर्षीच्या गणपती उत्सवाचे विशेष आकर्षण ठरला. नवनिर्माण कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट विभागाने या उत्सवाचे आयोजन केले होते. तसेच देखावा ही हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केला होता. उत्सवादरम्यान मुलांनी जल्लोषात व भक्तिभावाने आरत्या व जाखडी नृत्य सादर केले.
या उत्सवामध्ये नवनिर्माण कॉलेज संगमेश्वरच्या प्राचार्या तसेच नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी भक्तिभावाने सहभागी झाले होते.



