महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारचा वीजेच्या दरात कपातीचा निर्णय!

मुंबई : राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे,येत्या एक एप्रिलपासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. येत्या एक एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
एक एप्रिलपासून वीजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. वीज स्वस्त झाल्यानं याचा सर्वसामान्य घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे.
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. एका ठरावीक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतो. सध्याच्या दरानुसार घरगुती वीजबिल देखील हजारो रुपयांच्या घरात येतं. वीजबिलापोटी हजारो रुपये भरावे लागतात. मात्र आता नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



