मुख्य बातमी

जयस्तंभ परिसरातील एक बाजुची वाहतूक १४ एप्रिलला संध्याकाळपर्यंत बंद

रत्नागिरी : वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता १४ एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजूची वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ५ या दरम्याने वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून जेलनाका-जीजीपीएस- गीताभवन-जयस्तंभ मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौध्दजन पंचायत समितीतर्फे शासकीय रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे होणार असून, तेथील रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने सुरू ठेवल्यास अपघात घडून त्याद्वारे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १४ एप्रिलला जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ५ दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून जेल नाका-जीजीपीएस-गीताभवन-जयस्तंभ मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.
वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button