मुख्य बातमी

रत्नागिरी येथे माता रमाई व सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात 

भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेतर्फे कार्यक्रम

रत्नागिरी : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने माता रमाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती महोत्सव आज (७ फेब्रुवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्मिता कांबळे यांनी भूषविले. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिलांनी अभिवादन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, स्वप्नाली रोहित जाधव, एल. व्ही. पवार, दीपक जाधव, बी. के. कांबळे, शिवराम कदम, भरत सावंत, संतोष कांबळे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांनी माता रमाई यांच्या जीवनावर गौरव गीते गावून अभिवादन केले. एका चिमुकलीने क्रांतिज्योती सावित्री बाई फुले साक्षात जिवंत केल्या. तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रत्नागिरी महिला विभागाच्या वतीने उपस्थित महिलांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती सावंत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्मिता कांबळे, दीपाली जाधव, अवंतिका कांबळे, मानसी तांबे, अस्मिता कांबळे, निलिमा जाधव, विनया जाधव, स्वाती कांबळे, अर्चना पवार, आयु. अंजिरा आयरे, दर्शना कांबळे, भारती पवार, सपना पवार, प्राची जाधव आणि सर्व गाव शाखा व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button