मुख्य बातमीराजकीय

बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी रत्नागिरीत स्वाक्षरी मोहीम सुरू

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमानुसार प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनिष राऊत यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन व महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल (९ डिसेंबर) कॉंग्रेस भवन येथे आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम बंद करून बैलेट पेपरद्वारे घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष रमेश शाहा, जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष दीपक राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ईव्हीएम बंद करून बैलेट पेपरद्वारा निवडणुका घेण्याच्या कॉंग्रेस पक्षाच्या मागणीबाबतची वस्तुस्थिती सांगितली.

रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी नगरपालिका निवडणूक कॉंग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी मागणी केली. यावर शहराध्यक्ष रमेश शाहा यांनी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी बूथ कमिट्या बनविण्याच्या सूचना केल्या. तसेच कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेश कॉंग्रेसकडे कळविण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या वेळी महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, तालुका सरचिटणीस काका तोडणकर, आतिफ साखरकर, असलम शेख, सुदेश ओसवाल, अनिता शिंदे, जैनुद्दीन सारंग, फहिम, सोनाली धोत्रे, अजहर शेख, तंवकिर वस्ता, मेहबूब खतीब व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button