मुख्य बातमीसाहित्य-कला

वाचता वाचता बोलू काही”  राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धा

शिक्षणमहर्षी नंदकुमार मोहिते साहेब यांच्या स्मरणार्थ

रत्नागिरी : नंदकुमार मोहिते साहेब शरीराने आमच्यातून निघून गेले. पण विचारांनी ते कायम आमच्यासोबत आहे आणि राहतील, याची आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना कायम जाणीव आहे आणि ती राहील. त्यांनी बहुजनांच्या अनेक प्रश्नावर वाचा फोडण्याचे काम केले आहे. आणि त्यातील अनेक प्रश्न कायमचे मार्गी लावले आहे. सामाजिक चळवळीतून त्यांनी बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम निस्वार्थीपणे केलेले आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या संघटनातून एक प्रशस्त शिक्षण संकुल उभं केलं. त्यातून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारं उघडून दिली. त्यांचे कायम म्हणणे असायचे की, आपल्या मुलांनी योग्य ते शिक्षण घेऊन वंचित, दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. आपल्या मुलांनी स्वतःच्या शिक्षणातून सामाजिक भान जपले पाहिजे. त्यातून ही मुले स्वतः सक्षम होऊन पुढे समाज सक्षम करतील, असा त्यांचा विश्वास होता.आणि त्या हेतूनेच त्यांच्या स्मरणार्थ आम्ही राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

कोकणी कलाकार व इरलं संस्था

शिक्षणमहर्षी नंदकुमार मोहिते साहेब यांच्या स्मरणार्थ

वाचता वाचता बोलू काही” राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धा

📚 स्पर्धेसाठी आवाहन📚

प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

वाचन आणि अभिव्यक्तीची आवड असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

कोकणी कलाकार व इरलं संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

🔖 स्पर्धेतील बक्षिसे:

🏆 प्रथम पारितोषिक – ₹७,०००/-  

🥈 द्वितीय पारितोषिक – ₹५,०००/-  

🥉 तृतीय पारितोषिक – ₹३,०००/-  

 

स्पर्धेसाठी निवडलेली पुस्तके:

📖 इंधन – हमीद दलवाई  

📖 भाकरी आणि फूल – मधू मंगेश कर्णिक  

📖 मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे – माधव कोंडविलकर  

📖 *उजव्या सोंडेच्या बाहुल्या* – प्रविण दशरथ बांदेकर  

📖 *आयदान* – उर्मिला पवार  

📖 *रानवीचा माळ – अभिजीत हेगशेट्ये  

📖 *ऑक्टोपस* – श्री. ना. पेंडसे  

📖 *एस.ई.झेड* – शंकर सखाराम  

📖 *कोंडुरा* – चि. त्र्यं. खानोलकर  

📖 *धावटा धोटा* – मामा वरेरकर  

 

             *स्पर्धेचे नियम व अटी:*  

             *पात्रता:*  

– *वयोगट:* १८ ते २१ वर्षे  

– *शैक्षणिक पात्रता:* पदवीच्या *प्रथम ते तृतीय वर्षातील विद्यार्थी*  

*स्पर्धेचे स्वरूप:*

दिलेल्या पुस्तकांपैकी *कोणतेही एक पुस्तक निवडावे* व त्याचे *परीक्षण व्हिडिओ स्वरूपात* (७ मिनिटे) करावे.  

– ⁠*ही चित्रफित कोकणी कल्लाकार या युट्युब चॅनेलवर सर्वांसाठी खुली करण्यात येईल.*

– परीक्षणाच्या सुरुवातीला – नाव, पत्ता, वय, महाविद्यालय, पुस्तकाचे नाव आणि लेखकाचा परिचय द्यावा.  

– परीक्षणादरम्यान “ही चित्रफीत कोकणी कलाकार व इरलं संस्थेच्या राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेसाठी पाठवत आहे”  असा उल्लेख करावा.

– स्पर्धकाने पाठवलेले परीक्षण *स्वतःचेच असावे*, अन्यथा स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

– परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अंतिम तारीख:* *२० एप्रिल २०२५ 

*स्पर्धेतील सहभागासाठी आपली व्हिडिओ चित्रफीत पाठविण्याचा ई-मेल:*pustakwale@gmail.com [ई-मेल पत्ता] किंवा आपण टेलिग्राम संपर्क क्रमांकावर पाठवू शकता.

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क:*

प्रसाद सुरेश पाष्टे – ८८८८९१०९९८

राहुल जयवंत बेनेरे – ७७९८९३७८३३

सोनाली सुरेश कुरतडकर-७३८७६६७९१६

✨ *साहित्यप्रेमींनो, ही संधी दवडू नका! आपल्या वाचनगुणांना आणि अभिव्यक्तीला न्याय द्या!* ✨

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button