क्रीडामुख्य बातमी

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तायक्वांदो खेळाडूंना जिल्हा संघटनेकडून शुभेच्छा

रत्नागिरी : इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तथा उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे २४ खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार असल्याचे ‘ताम‘ राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे यांनी सांगितले.

३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंड येथे रंगणार असून ३२ विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ९०० पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.

तायक्वांदो या क्रीडा प्रकारात गतवर्षी क्युरोगी आणि पुमसे प्रकारात तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र (मुंबई) संघाच्या खेळाडूंनी अनेक पदके पटकावली होती. यावेळी सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी अपेक्षा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, निरज बोरसे, धुलिचदं मेश्राम, सदस्य अजित घारगे, सतीश खेमसकर आदींनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले क्युरोगी खेळाडू पुढीलप्रमाणे : पुरुष- ५४ किलो – अभिजित खोपडे, ५८ किलो- आयुष ओहल, ६३ किलो- शिवम शेट्टी, ६८ किलो- करण मंदाडे, ७४ किलो- पुष्पक महाजन, ८७ किलो वरील- गौरव भट, ८७ किलो आतील- अभिजीत सुकाले (वाईड कार्ड एन्ट्री) यांची निवड झाली आहे.

महिला गटात ४६ किलो आतील- साक्षी पाटील, ४९ किलो आतील- नयन बारगजे, ५३ किलो आतील- श्रुतिका टकले, ५७ किलो आतील- शिवानी भिलारे, ६२ किलो आतील- भारती मोरे, ६२ किलो आतील (वाईड कार्ड एन्ट्री) मनिषा गुट्टेदार, ६७ किलो आतील- सिद्धी बेडांळे, ७३ किलो आतील- अनामिका डेके, श्रावणी दांगट (वाईड कार्ड एन्ट्री), ७३ किलो वरील- श्रेया जाधव.

पुमसे पुरुष खेळाडू- वंश ठाकुर व शिवम भोसले (वैयक्तिक प्रकार) तर पुमसे महिला खेळाडू- राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती वसुंधरा छेडे, शिवम भोसले (पेअर), मृणाली हर्णेकर व वंश ठाकुर (पेअर), मृणाली हर्णेकर, वसुंधरा छेडे, व गृप प्रकारात गौरी हिंगणे, पागिणी शर्मा व धारा धनक.

प्रशिक्षकपदी प्रवीण बोरसे, प्रवीण सोनकुल, अमोल तोडनकर, रॅाबीन मेंजीस, अजित घारगे, प्रमोद कदम यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, नीरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, अजित घारगे, सदस्य सतीश खेमसकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव लक्ष्मण कररा, शशांक उपाध्यक्ष, शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, संजय उनसुर्वे, उपाध्यक्ष मयूर खेतले, सदस्य राकेश जाधव, सदस्य उत्तम पवार यांच्यासह सर्व तालुका अकॅडमी, क्लब प्रशिक्षक, जिल्ह्यातील सर्व खेळाडू यांनी सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button