छत्रपती शिवाजी महाराज जयंती नवनिर्माण शिक्षण संस्थेत साजरी

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी येथील एस. पी हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
या प्रसंगी सर्व प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुशील साळवी यांनी केले. याप्रसंगी विधी कापडी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रकट करणारा बहारदार पोवाडा सादर केला.
या निमित्ताने महाविद्यालयातील अनुश्री साळवी, ऋचा पवार, निखत मालगुंडकर, आयेशा सावकार, इफत ठाकूर या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त मनोगतं व्यक्त केली.
प्राचार्य माननीय डॉ. संजय गवाळे यांनी छ. शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना त्यांच्या कार्याची माहिती दिली. महाराजांनी सर्व जातीतल्या लोकाना एकत्र केलं त्यांच्या हातात शस्त्र दिला आणि आपलं स्वराज्य निर्माण केले. आपण आपल्यामध्ये गुण रुजवावेत आणि आपल्याकडून काहीतरी राष्ट्रसेवा घडावी अशी मनोगतातून इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणाले, वयाच्या अत्यंत कमी कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सगळा इतिहास घडलेला आहे, ज्यावेळेला संपूर्ण देश की ज्या वेळी देश नव्हता तर छोटी छोटी राज्य होती आणि ती पूर्णतः बाराव्या शतकापासून मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली होती महाराजांनी
कोकणातल्या, पुण्यातल्या काही मावळ्यांना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या न्हावी कुटुंबातल्या चांभार, कुंभार, माळी अश्या 18 पगड जातीतल्या लोकांना त्यांनी एकत्र केलं आणि एकत्र करून स्वराज्य निर्माण केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी विद्यार्थी मनोगतं, पोवाडा, युगत गीत यांचे उत्तम नियोजन करून कार्यक्रमाची आखणी केली.
याप्रसंगी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया पवार यांनी केले.



