मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यातील १७ पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर

सन २०२३ साठी प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मान 

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलातील १७ पोलीस अंमलदारांना २०२३ साठी त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आली आहेत.

सन्मान चिन्ह जाहीर केलेल्या पोलीस अंमलदारांची नावे अशी : दीपक मनोहर साळवी (सहाय्यक पोलीस फौजदार/७०८ रत्नागिरी शहर पोलीस ठाणे), प्रशांत संभाजी शिंदे (सहाय्यक पोलीस फौजदार/१०७२ संगमेश्वर पोलीस ठाणे), सचिन मधुकर सावंत (सहाय्यक पोलीस फौजदार/५५० महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा), समेळ विठ्ठल सुर्वे (सहाय्यक पोलीस फौजदार/१०८३ महामार्ग पोलीस मदत केंद्र, कशेडी), प्रमोद अनंत वाघाटे (सहाय्यक पोलीस फौजदार/२८९ राजापूर पोलीस ठाणे), संदीप मनोहर साळवी (सहाय्यक पोलीस फौजदार/११०२ जयगड पोलीस ठाणे), अश्विनी अनिल निखार्गे (महिला सहाय्यक पोलीस फौजदार/१०७३ पोलीस मुख्यालय रत्नागिरी), नारायण केशव रोडे (सहाय्यक पोलीस फौजदार/४१४ वाहतूक मदत केंद्र, रत्नागिरी), सुशील जगन्नाथ पंडीत (सहाय्यक पोलीस फौजदार/४०२ पोलीस मुख्यालय रत्नागिरी), धन:शाम रामचंद्र जाधव (सहाय्यक पोलीस फौजदार/२८६ महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा), अवधूत सुधाकर सुर्वे (पोलीस हवालदार/११४० पूर्णगड पोलीस ठाणे), ललित विठ्ठल देऊसकर (पोलीस हवालदार/२८५ पूर्णगड पोलीस ठाणे), वैभव विजय जाधव (पोलीस हवालदार/६३१ महामार्ग पोलीस मदत केंद्र, कशेडी), मधुरा मिलिंद गावडे (पोलीस हवालदार/११५४ महिला कक्ष, रत्नागिरी), गिरीश भिवा सावंत (पोलीस हवालदार/११८७ महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा), बिरुदेव सिदा कोळेकर (पोलीस हवालदार/६७२ अलोरे शिंरगाव पोलीस ठाणे), रमिज सिंकदर शेख (पोलीस हवालदार/४४४ ॲनेलिसीस विंग, रत्नागिरी)

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button