मुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

अखेर बाळ माने अडकले शिवबंधनात 

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने आज (२३ ऑक्टोबर) अखेर मातोश्रीवर शिवबंधनात अडकले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

गेले अनेक दिवस बाळ माने यांच्या ठाकरे शिवसेनेतील पक्ष प्रवेशाबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती आज अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून गेली 40 वर्षे भाजपशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार बाळ माने यांनी भाजपला राम राम केला. आज मातोश्रीवर सपत्नीक त्यांनी ठाकरे शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button