क्रीडामुख्य बातमी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी १४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

दि. २९ डिसेंबर २०२३ व दि. २५ जानेवारी २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/व्यक्ती यांच्याकडून १४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर १४ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत आणि २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button