मुख्य बातमीविधानसभा निवडणूक २०२४

जिल्ह्यातील ८५ वर्षांपुढील तीन हजार आणि ५०० हून अधिक दिव्यांग मतदार करणार घरातून मतदान

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये १४ ते १७ नोव्हेंबर या काळात गृह मतदान होणार आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाचही विधानसभा मतदारसंघात तशी सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली आहे. जिल्ह्यातील ८५ वर्षांपुढील ३ हजार ५८३ मतदार आणि ५९२ दिव्यांग मतदारांचे उद्यापासून घरातून मतदान होणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय ८५ वर्षांपुढील गृह मतदानासाठी पात्र मतदार पुढीलप्रमाणे : दापोली – ८१७, गुहागर – ७६८, चिपळूण- ७२४, रत्नागिरी – ६६१ आणि राजापूर – ६१३ अशी एकूण ३,५८३ मतदार.

विधानसभा मतदारसंघनिहाय गृहमतदानासाठी पात्र दिव्यांग मतदार पुढीलप्रमाणे : दापोली – ११३, गुहागर – १३६, चिपळूण- १११, रत्नागिरी – १२६ आणि राजापूर – १०६ अशी एकूण ५९२ इतके मतदार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button