महाराष्ट्र राज्यरत्नागिरी जिल्हा वृत्त

Marathi Tourist ला मिळाला Radio City Golden Tick Viral Award

रत्नागिरीतील सोशल मिडिया क्रिएटर ह्रषिकेश मगर हे मराठी टूरिस्ट या नावाने इंस्टाग्राम आणि युट्युबवर व्हिडियोज बनवतात.

कोकणातील खाद्यसंस्कृती आणि पर्यटन स्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मागील २ वर्षांपासून सातत्याने ते काम करत आहेत.उत्तम दर्जाचे स्ट्रीट फूड तसेच छोटे छोटे फूड स्टॉल,रेस्टॉरंट सर्वांना समजावे यासाठी त्यांनी आजपर्यंत १५० पेक्षा जास्त ठिकाणांचे व्हिडियोज सोशल मिडियावर अपलोड केले आहेत.

रेडियो सिटी यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रिएटर्सचा सिने अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आणि यामध्ये ह्रषिकेशचा सन्मान करण्यात आल्याने हि समस्त कोकणकरांसाठी आणि रत्नागिरीकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button