क्रीडामुख्य बातमी
जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे खुल्या गटासाठी खेळाडूंची बुधवारी निवड चाचणी

रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या खुल्या गट सामान्यांसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे खुल्या गटासाठी खेळाडूंची निवड चाचणी बुधवारी (२५ डिसेंबर) सावंत क्रिकेट ग्राउंड, कोळंबे येथे होणार आहे.
निवड चाचणीसाठी खेळाडूंनी सकाळी ८.३० वाजता मैदानावर हजर राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, कार्यवाह दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, सचिव बिपिन बंदरकर यांनी केले आहे.
या निवड चाचणीसाठी येताना २०० रुपये शुल्क, आधार कार्ड, जन्म दाखला सोबत घेऊन यायचे आहे. अधिक माहितीसाठी सहसचिव मनोहर गुरव (9890747525), व सहसचिव बलराम कोतवडेकर (9921003394) यांच्याशी संपर्क साधावा.



