मुख्य बातमी

मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅली

रत्नागिरी : मतदार जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवारी (ता. ७) सकाळी ६.३० वाजता पोलीस मैदान येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वीप’ अंतर्गत होणाऱ्या या रॅलीमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ६ एप्रिलला ४ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी. या रॅलीत जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती लेखाधिकारी उमेश मगदूम यांना (९१७२७०९१७२) करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button