वाचन प्रेरणा दिनानिमित्त एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मुंबई उपकेंद्रातील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला भेट

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असणाऱ्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला भेट दिली.
महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी केली. यावेळी नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख डॉ. सुकुमार शिंदे, प्रा. सुशील साळवी, प्रा. सचिन गिजबीले, ग्रंथालय प्रमुख मेघा पोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर महाविद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असणाऱ्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला भेट घेऊन त्याची माहिती घेतली.
उपकेंद्रात सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लाभ महाविद्यालयातील मुलांनी घ्यावा हा यामागचा हेतू होता. यावेळी उपकेंद्रातील ग्रंथपाल बिपिन जाधव, उप कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेविषयी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी महाविद्यालयातील ग्रंथालय प्रमुख श्रीमती पोरे, प्रा. साळवी यांच्यासह प्रा. तेजस्विनी पवार, प्रा. निकिता नलावडे, प्रा. तन्वी सुर्वे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई, प्रा. तेजल खानविलकर आदी उपस्थित होत्या.



