क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

दापोली येथे जिल्हा मानांकनपद कॅरम २८, २९ डिसेंबरला स्पर्धा 

जॉली स्पोर्ट्स दापोली आणि लायन्स क्लब दापोली यांच्या वतीने आयोजन 

दापोली : येथील जॉली स्पोर्ट्स क्लब आणि लायन्स क्लब दापोली यांच्या वतीने २८ व २९ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांत खेळवली जाणार आहे.

स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका मंगळवारी (२४ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्याव्यात. तालुका प्रतिनिधी पुढील प्रमाणे आहेत : गुहागर : प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी : विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख : राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण : साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर : मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा : मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड : योगेश आपटे (९९५३२२२६३१ ), राजापूर : मनोज सप्रे (९४०३७६८३७६ ), दापोली : माधव शेट्ये (९२०९७०९७९२).

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन जॉली स्पोर्ट्सचे अध्यक्ष अरुण गांधी, सचिव श्रीराम माजलेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर , उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज आणि सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button