मुख्य बातमी

कसबा येथून मारुती मंदिर येथे उद्या येणार धर्मवीर ज्वाला

रत्नागिरी : धर्मवीर संभाजीराजे भोसले यांना ज्या ठिकाणी अखेरचे जेरबंद करण्यात आले त्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले कसबा (ता. संगमेश्वर) येथील संभाजी महाराज स्मारक ते रत्नागिरी मारुती मंदिर सर्कल येथे उद्या (ता. ७) सकाळी धर्मवीर ज्वाला आणली जाणार आहे.
उद्या संगमेश्वर कसबा येथून धर्मवीर ज्वाला पहाटे ३ वाजता प्रस्थान करून सकाळी ६.४५ वाजता शिवतीर्थ मारूती मंदिर सर्कल येथे येणार आहे. धर्मवीर ज्वाला म्हणजे नुसती ज्वाला‌ नसुन स्वधर्म रक्षणाची आग, रग, धग निर्माण करणारे शक्तीपीठ आहे. निपचित पडलेल्या हिंदू मनात स्वाभिमान उत्पन्न करणारे ऊर्जास्रोत आहे. ज्यांच्या अद्वितीय बलिदानाने महाराष्ट्र कणखर झाला त्या शंभुराजांच्या बलिदानाची जाणीव, चीड, सल आमच्या मनात तेवत ठेवणारी ही ज्वाला आहे.
रत्नागिरीमधील सर्व शिवशंभूप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जयदीप साळवी (९९२२४२९५७७), अक्षत सावंत (९९२१११६३८९) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button