मुख्य बातमीराजकीय

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा मनसेच्या वतीने सत्कार

अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा

रत्नागिरी : मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तर्फे राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा पाली येथील निवासस्थानी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंत्री सामंत यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा देखील करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील सरकारी बँक, पोस्ट ऑफिस येथील परप्रांतीय कर्मचारी मराठी भाषेबद्दल दाखवत असलेली अनास्था मंत्री सामंत यांच्या नजरेत आणून दिली. तसेच भटक्या श्वानांची व्यवस्था, सागरी संशोधन केंद्र झाडगाव येथे होत असलेल्या अद्ययावत मत्स्यालयामुळे संशोधन केंद्राचे होणारे नुकसान अशा अनेक गोष्टींवर सकारात्मक चर्चा झाली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, वाहतूक सेना जिल्हाचिटणीस रूपेश चव्हाण, महिला आघाडी शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ, महिला शहर सचिव संपदा राणा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button