बेळगाव येथे १५ डिसेंबर रोजी माजी सैनिकांचा मेळावा

रत्नागिरी : मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील शिवाजी स्टेडियम येथे १५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ४ यावेळेत माजी सैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पेन्शन, मेडिकल व स्पर्श (SPARSH) विषय व इतर अभिलेख विषयी अडचणी असल्यास या मेळाव्यात सहभागी होऊन अडी-अडचणींचे निरसन करता येणार आहे. त्यासाठी आपल्यासोबत PPO, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच डिर्चाज बुक PART II ORDER च्या कॉपी (असल्यास) पॅन कार्ड, ECHS कार्ड, कॅन्टीन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र घेऊन या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जे माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबित या मेळाव्यात अडी-अडचणी सोडविण्यासाठी जाण्यास उत्सुक आहेत, अशा व्यक्तींनी आवश्यकता व्यवस्थेसाठी ८३१७३५०५८४ या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ७२१८४९८६२७ या क्रमांकावर संपर्क करावा.



