केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भूपेंद्र यादव यांची भेट
आगामी विधासभा निवडणुकीबाबत चर्चा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि महाराष्ट्राचे भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दादर येथील भाजप कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण ठरली .यावेळी ना. आठवले यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावने, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांचा समावेश होता.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री ना. यादव यांच्याशी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री ना. आठवले यांनी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला किमान १२ जागा देण्यात याव्यात असा प्रस्ताव रिपब्लिकन पक्षातर्फे भाजपला देण्यात आला. आगामी विधासभा निवडणुकीबाबत ना. आठवले आणि ना. यादव यांच्यात चर्चा झाली.
भाजपचे प्रभारी केंद्रीय मंत्री ना. यादव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रिपब्लिकन पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागांचा वाटा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असून भाजपला रिपब्लिकन पक्षाने चांगली साथ दिलेली आहे. रिपब्लिकन पक्षाला भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत १२ जागा देण्यात याव्यात आणि राज्य महामंडळाची २ अध्यक्ष पदे देण्यात यावीत तसेच राज्यपाल नियुक्त १२ सदस्या पैकी १ विधान परिषद सदस्यत्व रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावे, या मागण्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असुन या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी भुपेंद्र यादव यांच्याशी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. आठवले यांची सकारात्मक समाधानकारक चर्चा झाल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आली.



