मुख्य बातमीराजकीय
कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील युवकांचा मनसेत प्रवेश

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप जिल्हा परिषद गटातील कोळंबेमधील अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज (ता. ५) मनसेच्या रत्नगड या रत्नागिरी तालुका संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश केला. या युवकांचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी स्वागत केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणीसाठी मनसेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येणाऱ्या काळात असे अनेक पक्षप्रवेश तसेच संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येणार आहे.
या पक्षप्रवेश प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्यासह तालुका सचिव अभिलाष पिलणकर, विभाग अध्यक्ष संजय आग्रे, उपविभाग अध्यक्ष नितीन रायकर, सोमनाथ पिलणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.



