मुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

मुरुगवाडा येथील तरुणांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मुरुगवाडा येथील अनेक तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

यामध्ये साहिल तोडणकर, संदेश कुवळेकर, शिवम तोडणकर, स्वप्नील भोंगले, चैतन्य भोंगले, चिन्मय नायर, मिथिल मयेकर, ओमकार सुर्वे, अनिकेत पिलणकर, अनिष पिलणकर,नकुल ऐवळे, भारद्वाज पिलणकर, रुणाल सुर्वे, ईशान खेडेकर आदींचा सामावेश आहे.

मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर येथील अनेक लोकांनी ठाकरे शिवसेनेपासून फारकत घेत अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या तरुणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी उबाठा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या विकासासाठी, न्यायासाठी, परिवर्तनासाठी आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे बाहू आणखी मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे या तरुणांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक तथा युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत, उपशहर प्रमुख बावा चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button