“अभिजात मराठी भाषा सन्मान” दिवस २०२५ उद्घाटन सोहळा

मुंबई :- आज रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस २०२५’ उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं की, लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत घेऊन तेथे “छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक भाषा केंद्र” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई येथील मराठी भाषा भवनाचे काम आणि एरोली येथील उपकेंद्राचे काम वेगाने सुरू असून लवकरच पूर्ण होणार आहे.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे जिल्हा स्तरावर मराठी तज्ञांची नेमणूक करण्यासाठी परवानगीची मागणी केली. “मराठी दूत” योजना राबवून शाळा आणि ग्रामीण भागात मराठीचा प्रसार करण्याचा संकल्पना मांडण्यात आली.
यावेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या सर्वांचा गौरव करण्यात आला. भाषेच्या संवर्धनासाठी शासनाने घेतलेल्या विविध ऐतिहासिक निर्णयांचा आढावा घेण्यात आला आणि आगामी काळात मराठीला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी नव्या योजना राबवण्याचे संकल्प करण्यात आले.
या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेते,दिग्दर्शक महेश मांजरेकर आमदार मनीषाताई कायंदे, सदानंदजी मोरे, रविंद्रजी शोभने आदी मान्यवर मराठी भाषा विभागाचे अधिकारी, तसेच नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



