मुख्य बातमीशैक्षणिक

‘नवनिर्माण हाय’च्या भार्गवी पवार, सई सुवारे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सीबीएससी साउथ झोन तायक्वांदो चॅम्पियनशिप

रत्नागिरी : कोपरगाव (शिर्डी) येथे नुकत्याच झालेल्या सीबीएससी साउथ झोन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२४-२५ मध्ये पुणे विभागातून सहभागी झालेल्या नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या भार्गवी सत्यविजय पवार आणि सई संदेश सुवारे या दोघींची निवड राष्ट्रीय सीबीएससी आंतरशालेय चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. ही स्पर्धा ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान उत्तराखंड येथे होणार आहेत.

सीबीएससी बोर्डाच्या वतीने साऊथ झोन सीबीएससी तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२४-२५ चे आयोजन १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत कोपरगाव येथे करण्यात आले होते. साऊथ झोनमधून पुणे विभाग, बेंगलोर विभाग आणि तिरुवनंतपुरम विभागातील शाळा सहभागी झाल्या होत्या. यात नवनिर्माण हायस्कूलचाही सामावेश होता. या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटांत चमकदार कामगिरी करत नवनिर्माण हायमधील भार्गवी पवार (इयत्ता आठवी), सई सुवारे (दहावी) यांनी रौप्य पदक, तर हर्षदा मोहिते (दहावी) हिने कांस्य पदक पटकावले. वेदांत देसाई (आठवी) आणि युवराज पवार (आठवी) यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

सीबीएससी आंतरशालेय चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सई सुवारे भार्गवी पवार यांच्यासह डावीकडून प्रशिक्षक प्रतीक पवार, मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये.

आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भार्गवी पवार आणि सई सुवारे यांची निवड उत्तराखंड येथे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सीबीएससी आंतरशालेय चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. खेळाडू ७ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतून रवाना होतील. खेळाडूंचे संघ प्रशिक्षक म्हणून प्रतीक पवार साऊथ कोरिया ब्लॅक बेल्ट फर्स्ट दान राष्ट्रीय प्रशिक्षक यांची निवड करण्यात आली आहे.

हे पाचही विद्यार्थी सध्या रत्नागिरीतील युवा तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक राम करा आणि प्रतीक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदो चे धडे गिरवत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, क्रीडा शिक्षक अमृत गोरे यांनी भार्गवी पवार आणि सई सुवारे यांचे अभिनंदन केले तसेच स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button