मुख्य बातमीराजकीय

नवरात्रीनंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर होणार : गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर 

गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा आणि शिवसेनेलाच मिळणार ; महायुती म्हणून विपुल कदम यांचा प्रचार करणार 

गुहागर : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार विपुल कदम हेच असणार असणार असून महायुतीचे तसेच सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी विपुल कदम यांना निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असे शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी सांगितले.

दीपक कनगुटकर

गुहागर तालुक्यात सध्या महायुतीचा उमेदवार कोण याबाबत अनेक चर्चा चालू असून यासंदर्भात शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सध्या गुहागरात अनेक राजकीय घडामोडी घडत असून आमच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे की, गुहागर विधानसभेचा उमेदवार हा शिवसेनेचाच असून शिवसेनेकडून विपुल कदम हे उमेदवार म्हणून काम करायला तयार आहेत तशी त्यांची गुहागर विधानसभा मतदारसंघात बांधणी ही चालू झाली आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गुहागरमध्ये नवीन चेहरा व तरुण रक्त मिळाले तर गुहागरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नक्कीच चालना मिळेल आणि त्यामुळे गुहागरमधील आजी-माजी सर्व शिवसैनिक जोरदारपणे कामाला लागले असून त्याची प्रचिती नवरात्र उत्सवानंतर सर्वांना दिसेल.

विपुल कदम

गुहागर हे सन २००९ सन २०१४ सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा शिवसेनाच होती आणि या जागेवर शिवसेनेला जास्त मतदारांचा कौल आहे. त्यामुळे या जागेवर शिवसैनिकच सतत दावा करत राहणार आहेत, पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, गुहागरचा उमेदवार हा शिवसैनिकच असेल त्यामुळे विपुल कदम यांचे पूर्ण कुटुंब शिवसेनेचे आहे, मागील झालेल्या निवडणुकीमध्ये विपुल कदम यांचे वडील गुहागरात तळ ठोकून बसले होते, आम्हीही त्यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे मला पूर्ण याची कल्पना आहे की विपुल कदम हे चांगल्यारितीने काम करू शकतील. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असेल हे पालकमंत्र्यांच्या बोलण्यात काही चुकीचे वाटत नाही.

रामदास भाई कदम आम्हा सर्वांचे वरिष्ठ नेते आहेत. वरिष्ठ पातळीवर आमच्या नेत्यांशी चर्चा होईल व सर्व सुरळीत होईल, अशी आम्हाला खात्री आहे. विपुल कदम यांची गुहागर विधानसभेची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित होईल व सर्व महायुतीचे पदाधिकारी व मित्र पक्षाचे पदाधिकारी विपुल कदम यांचे काम करतील, असा आम्हाला सर्वांना खात्री आहे, असे श्री. कनगुटकर यांनी शेवटी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button