मुख्य बातमीराजकीय

आमदार राजन साळवी यांच्या ग्रामपंचायतनिहाय आढावा बैठका

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात आयोजन

राजापूर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील समस्या, मागणी व नियोजनाच्या अनुषंगाने आमदार राजन साळवी यांनी टप्या-टप्याने राजापूर तालुक्यातील १०१, लांजा तालुक्यातील ६०, तर साखरपा विभागातील १५ अशा एकूण १७६ ग्रामपंचायतींतीच्या आढावा बैठकींचे आयोजन केले आहे. या बैठकांची सुरुवात ८ ऑगस्टपासून लांजा तालुक्यातील ग्रामपंचायतींपासून होणार आहे.

या आढावा बैठकीमध्ये ग्रामीण भागातील रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण,विद्युत,जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदी शासकीय योजना व विकासकामांबाबत ग्रामस्थांच्या समस्या व अडचणींचा आढावा घेऊन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

या आढवा बैठकीमुळे ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत शासकीय योजनांचा प्रसार, समस्या निवारण व सर्वांगणी विकास साधण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button