मुख्य बातमीसाहित्य-कला

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्रातून 'कडीपत्ता' प्रथम

रत्नागिरी : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, रत्नागिरी या संस्थेच्या “कडीपत्ता” या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल असे : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेच्या “स्वप्नपक्षी” या नाटकास द्वितीय पारितोषिक, तर श्रीरंग, रत्नागिरी या संस्थेच्या “माफर्कोसीस” या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक प्रसाद धोपट (नाटक- कडीपत्ता), द्वितीय पारितोषिक मनोहर जोशी (नाटक-स्वप्नपक्षी), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक मंगेश लकडे (नाटक- स्वप्नपक्षी), द्वितीय पारितोषिक अदित्य दरवेस (नाटक- कडीपत्ता), नेपथ्य : प्रथम पारितोषिक प्रदीप तेंडूलकर (नाटक- स्वप्नपक्षी) द्वितीय पारितोषिक प्रदीप पाटील (नाटक- कडीपत्ता), रंगभूषा : प्रथम पारितोषिक नरेश पांचाळ (नाटक- कडीपत्ता), द्वितीय पारितोषिक उदय तांगडी (नाटक- माझ्या आजीचा बॉयफ्रेंड) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गोपाळकृष्ण जोशी (नाटक- मार्कोसीस) व अमीशा देसाई (नाटक- कडीपत्ता), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे समीक्षा सावंत देसाई (नाटक- अखेरचा सवाल), प्रज्ञा वारणकर (नाटक- माझ्या आजीचा बॉयफ्रेंड), गार्गी सावंत (नाटक- कडीपत्ता), विजय मिरगे (नाटक- माझ्या आजीचा बॉयफ्रेंड), किशोर साठे (नाटक- मार्कोसीस), संजय शेलार (नाटक- अखेरचा सवाल)

दि. २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृह येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवानंद चलवादी, कैलास टापरे आणि श्रीमती मीना वाघ यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button