मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

मातृमंदिरच्या बालक मंदिरात दिपोत्सव साजरा

देवरूख /सुरेश सप्रे :- देवरूख येथिल मातृमंदिर संस्थेने कै. इंदिराबाई हळबे यांच्या प्रेरणेतून १९५६ साली स्थापन झालेल्या प्रसाद बालक मंदिरात दरवर्षी दिपोत्सव साजरा करण्यात येत असतो.

यंदा या प्रसाद बालक मंदिर (शिशुविहार) मधलीआळी देवरुख येथे बालगोपाळासह दिपोत्सव साजरा करण्यात आला. या दिपोत्सवाचे उद्घाटन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले. यावेळी संस्थेचे अभिजित हेगशेट्ये. विनय पानवलकर. मेस्त्री. विलास कोळपे आदी पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी मुख्याधिकारी भोसले यांचा हळबे मावशींच्या जीवनावर आधारीत असलेले अभिजित हेगशेट्ये यांनी लिहिलेले पुस्तक भेट म्हणून देत सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणेण्यांचे उपस्थितीने बाल विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी प्रमुख पाहुणे ,पालक , विद्यार्थी यांनी फराळाचा आस्वाद घेतला.

प्रसाद बालक मंदिरात १००शिशु विद्यार्थी आहेत. या दिपोत्सवासाठी मिनल देसाई , श्रुती पाष्टे , प्रांजली कारेकर ,प्रतिक्षा मांगले , अनुष्का शिंदे ,वेदा कळंबटे यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button