क्रीडामुख्य बातमी

३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धत रत्नागिरी द्वितीय क्रमांकावर

रत्नागिरी : जळगाव येथे आयोजित केलेल्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर क्योरोगी अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धेत क्योरीगी व पुमसे प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत १४ वर्षे मुले गटांत आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावलेल्या अर्थव मुरुकुटे याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

जळगाव जिल्हा तायक्यांदो असोसिएशन तथा तायक्यांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर क्योरोगी अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धा व १० वी पुमसे स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅटमिटन हॉल येथे आयोजित केली होती. मुले व मुली गटांत सुवर्णपदक विजेत्यांची

१४ वर्षांखालील मुली गटात बरखा संदे आणि मृण्मयी वांयगणकर यांनी रौप्य पदक, तर दुर्वा हातिसकर हिने कांस्य पदकाला गवसणी घातली. सुरभी पाटील, श्रेयसी हातिसकर हे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. या खेळाडूंना गणराज क्लबचे महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक प्रशांत मनोज मकवाना व एसआरके क्लबचे अध्यक्ष व प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिदें यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष नीरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के., खजिनदार शंशाक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button