मुख्य बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे किरण सामंत यांना शुभेच्छा

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) रत्नागिरीतर्फे लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांना ७ जानेवारी रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष अॅड. देवेंद्र तथा बंटी सदानंद वणजू, ओबीसी सेल रत्नागिरी तालुकाध्यक्ष पप्पू तोडणकर, युवक तालुकाध्यक्ष अॅड. साईजीत शिवलकर, शहर अध्यक्ष अॅड. राकेश आंब्रे, महाकाली राजापूरचे उद्योजक अॅड. अक्षय शेट्ये, पाचलचे उद्योजक जगदीश (सोनु) पाथरे, लांज्जा येथील उद्योजक राजू कुरूप आणि सचिन शेट्ये उपस्थित होते.



