मुख्य बातमी
काँग्रेस भवनमध्ये ध्वजारोहण सोहळा

रत्नागिरी : येथील काँग्रेस भवनमध्ये देशाच्या ७६व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस रूपाली सावंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष दीपक राऊत, कार्यालय सरचिटणीस काका तोडणकर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष अनिता शिंदे, सुदेश ओसवाल यांसह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



