मुख्य बातमी

गरीब वृद्ध महिलेला लुबाडणाऱ्या एका मोबाईल शॉपीवाल्याला ‘शिवसेना स्टाईल’ने समज

सीसीटीव्ही फुटेजमधून आले सत्य समोर: शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेला मिळाला न्याय

रत्नागिरी : शहरातील एका नेहमीच्या गजबजलेल्या ठिकाणी एक गरीब, कष्टकरी वृद्ध महिला एका मोबाईल दुकानात मोबाईल घ्यायला गेली होती. मोबाईल घेतल्यानंतर त्याचे पैसे ही दिले; मात्र त्या महिलेकडून पैसे घेऊनही मोबाईल शॉपीवाल्याने पैसे घेतल्याचे नाकारले.

‘तुम्ही पैसे दिले नाहीत, तुम्ही खोटे बोलताय’ असे म्हणून त्या वृद्ध महिलेला दोन तास बसवून ठेवले आणि लवकर पैसे द्या, असा तगादा त्या दुकानदाराने लावला. तसेच ‘थांबा, तुम्हाला पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात देतो’ असे धमकावले. या घटनेने भेदरलेल्या त्या वृद्ध महिलेला रडू कोसळले. ही महिला गरीब असून ती रत्नागिरीत घरकाम करते. तसेच तिची दोन मुले मुंबईत छोटी मोठी कामे करतात. एकट्या महिलेला बघून तिला लुबाडायला निघालेल्या या दुकानदाराचा हा सगळा कारनामा शिवसेनेच्या एका महिलेला समजला आणि तत्काळ त्यांनी त्या दुकानात धाव घेतली.

तसेच घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती त्यांनी शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांना दिली. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे आणि शहरप्रमुख प्रशांत साळुंखे या शिवसेनेच्या वाघांनी त्या दुकानात धाव घेत घडल्या प्रकाराची खात्री केली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करताना त्यात त्या वृद्ध महिलेने दुकानदारास पैसे दिल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर दुकानदाराने सुद्धा त्या महिलेने पैसे दिलेले मान्य केले.

त्यानंतर मात्र शिवसेना स्टाईलने त्या दुकानदाराचा सत्कार केला यथेच्च प्रसाद मिळताच आणि आपली चूक लक्षात येताच दुकानदाराने माफी मागून पुन्हा असा प्रकार माझ्या हातून घडणार नाही, मी माझी चूक कबूल करतो, असे सांगितले.

शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांनी पुन्हा जर मराठी माणसाला आणि स्थानिकांना त्रास दिलास तर याद राख, असा सज्जड दम दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button