स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात रंगणार महिलांचे नमन
२१ डिसेंबर रोजी आयोजन : १४ ते ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग

रत्नागिरी : जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी या मंडळांच्या वतीने शनिवारी (२१ डिसेंबर) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पौराणिक, ब्रह्मसत्य, गण आणि भन्नाट विनोदी गौळणींनी नटलेले चौरंगी नमन सादर करण्यात येणार आहे. यात १४ ते ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग आहे.
माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी या मंडळाने महिलांना व्यासपीठ दिले आहे. या मंडळातर्फे फक्त महिला कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नमन सादर केले आहे. या नमनाचे दिग्दर्शन नमनसम्राट यशवंत वाकडे असून निर्माता साईनाथ नागवेकर हे आहेत. नेपथ्याची बाजू संतोष उर्फ बावा आग्रे हे सांभाळणार असून, सूत्रधार सागर मायगंडे, वासुदेव वाघे हे आहेत. नमनाला बुलबुलतरंग परशुराम घवाळी, ॲटोपॅडसाथ श्री. मांडवकर, की बोर्डसाथ प्रवीण सावंतदेसाई, ढोलकीसाथ पार्तेज आंबेरकर करणार आहेत. गीतलेखन सौ. सर्वता चव्हाण यांनी केले आहे. तर गायिका सौ. आकांक्षा वायंगणकर आहेत. यासाठी दादा वाडेकर, शरद गोळपकर, राकेश बेर्डे, संजय मेस्त्री, मदन डोर्लेकर, सौ. मानसी साळवी यांचे विशेष सहाय्य लाभले आहे.
या नमनात सौ. प्रेरणा विलणकर, सौ. वेदा शेट्ये, सौ. पूनम गोळपकर, सौ. शीतल सकपाळ, सौ. रेश्मा शिंदे, सौ. माधवी पाटील, सौ. समीक्षा वालम, सौ. विनया काळप, सौ. अर्चना मयेकर, सौ. तन्वी नागवेकर, सौ. गीता भागवत, श्रीमती रेखा खातू, कु. पूर्वा चव्हाण, कु. जुही पावसकर, कु. शोभना वडपकर, कु. शमिक्षा विलणकर या कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
या मंडळाला आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी या भजन मंडळाने सहाय्य केले आहे.



