मुख्य बातमी

रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

रत्नागिरी : भंडारी समाजाला गेली २ वर्षे प्रतिक्षेत असलेला प्रत्यक्ष वधू-वर सूचक मेळावा रत्नागिरीतील ८० फुटी हायवे येथील गगनगिरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. मागील कार्यकारिणीने समाज संघाची निवडणूक लादल्यानंतर नवीन कार्यकारिणीने नूतन अध्यक्ष राजीव कीर यांच्या मार्गदर्शनाखाली ४७ भंडारी वस्तींच्या गावांमध्ये गावभेट कार्यक्रम आयोजित करीत वधू वरांची नोंदणी करून घेतली आणि तब्बल दोन वर्षांनी हा वधू-वर परिचय मेळावा झाला.

मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आंबुलकर. शेजारी मान्यवर

भंडारी समाज संघामध्ये १० वर्षांपूर्वी उपाध्यक्षा ॲड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांच्या संकल्पनेतून वधू-वर सूचक मंडळाची स्थापना करण्यात आली. अत्यंत अल्प दरात नोंदणी करून वधू-वरांचे लग्न जुळेपर्यंत त्याच नोंदणीमध्ये ही सेवा दिली जाते. कोणतेही नूतनीकरण शुल्क आकारले जात नसल्यामुळे या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली.
मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष राजीव कीर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, मेळावा प्रमुख सौ. प्रज्ञा तिवरेकर, निवृत्त तहसीलदार राजेंद्र बिर्जे, दिलीप रेडकर, प्रकाश मांजरेकर, अमृता मायनाक, सौ. दया चवंडे, सौ. स्वाती मयेकर, आप्पा वांदरकर, बाबू मयेकर आदी उपस्थित होते.

वधू-वर मेळाव्यात नोंदणीसाठी झालेली गर्दी

या मेळाव्याला वधू-वर आणि पालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जुन्या नोंदणी केलेल्यांना थेट प्रवेश देण्यात आला. नवीन नोंदणी करून आलेल्या वधू-वरांसहित मोठ्या एलईडी स्क्रिनवर फोटो व बायोडाटासह माहिती दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मयेकर, अॅड. तिवरेकर, चंद्रहास विलणकर व अमृता मायनाक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हातीसकर, दीपक तोडणकर, आबु भाटकर, महेंद्र सुर्वे, स्वाती मयेकर, प्रशांत मयेकर, मुकुंद विलणकर, नेहा नागवेकर, विजय भाटकर, प्रशांत मयेकर, नीलेश बिर्जे, विजय बिर्जे, अनंत भाटकर, दीपक तिवरेकर यांनी मेहनत घेतली. जेवण नाष्टा गणेश धुरी यांनी, तर एलईडी स्क्रीन प्रणीत शेट्ये यांनी उपलब्ध करून दिली. नंदू मोरे यानी साऊंड सर्व्हिस दिली. सचिव आभार चंद्रहास विलणकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button