मुख्य बातमी

स्वराभिषेक-जयेश मंगल पार्क आयोजित सूरमयी दिवाळी पहाट उत्साहात

रत्नागिरी : स्वराभिषेक व जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. स्वराभिषेक संगीत वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या मैफलीत शास्त्रीय संगीताबरोबरच एकापेक्षा एक सुगम गीते सादर करून रसिकजनांना मंत्रमुग्ध केले.

निवृत्त पाचार्य डॉ. दत्ता पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी ॲड. राजशेखर मलुष्टे, विनया परब, केदार लिंगायत, श्रीयुत तांबे, राजेश घोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दीप्ती आगाशे आणि गौतमी वाडेकर यांनी सादर केलेल्या राग जौनपुरीतील बंदिशीने पहाट मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर अभंगांच्या मेडलीने वातावरण भक्तीमय बनवले. ओवी, वासुदेव, जय दुर्गे दुर्गती, दिवाळी येणार, आज अयोध्या सजली, जन विजन झाले, ज्योती कलश, उठ पंढरीच्या, सर्वांगे सुंदर, रूणुझुणू रूणुझुणू रे, जय शारदे वागेश्वरी, आदिमाया अंबाबाई, गगन सदन, जय जय शिवराया, कौसल्येचा राम, पूर्व दिशा उजळली अशा सुमधूर भक्तिगीतांनी, अभंगांनी, जय शंकरा गंगाधरा आदी नाट्यगीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. स्वातंत्र्यवीरा तुझी आरती या गीताने मैफलीची सांगता झाली.

स्वराभिषेकच्या शिष्यवर्गापैकी स्वरा भागवत, आदित्य दामले, सिध्दी शिंदे, तन्वी मोरे, मधुरा लाकडे, स्वरा लाकडे, संस्कृती जोशी, शंतनु पावसकर, मीरा बापट, हर्षदा सावंत, उत्तरा केळकर, स्वरा यादव, विश्वास सनगरे, आर्या काटदरे, अनया वाडेकर, गायत्री पोवार, स्वराणी आडविलकर, विष्णूपिया पवार, समीक्षा वाडकर, मीरा सोवनी, स्वरा लाकडे, दुहिता घोलकर, पूर्वा नागवेकर, राधिका ढोल्ये, त्रिवेणी चवंडे यांनी गाणी सादर केली. मनाली नाईक, पूर्वा साने आणि मधुरा लाकडे यांनी निवेदन केले. या मैफलीला हार्मोनियमसाथ महेश दामले, कीबोर्डसाथ मंगेश मोरे, तबलासाथ केदार लिंगायत, पखवाजसाथ मंगेश चव्हाण, बासरीसाथ मंदार जोशी आणि तालवाद्यांची साथ अद्वैत मोरे यांनी केली. ध्वनी संयोजन एस कुमार साऊंडचे उदयराज सावंत आणि सहकारी यांनी केले.

मधुरा लाकडे यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या पुष्परांगोळीचे अनेकांनी कौतुक केले. मैफल यशस्वी होण्यासाठी जयेश मंगल पार्कचे व्यवस्थापक ओंकार रहाटे, श्री. देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button