रत्नागिरीतील साळवी स्टॉप, जेल नाका, भाट्ये बीचवर ‘नो पार्किंग झोन’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रत्नागिरीत जाहीर सभा

रत्नागिरी : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने दौऱ्यादरम्यान वाहतूक कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी उद्या (३ मे) सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत शहरातील साळवी स्टॉप, जेल नाका, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, भाट्ये बीचपर्यंतचा रस्ता हा दोन्ही बाजूने ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केली आहे.
उद्या रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा जिल्ह्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत दौरा कार्यक्रम होणार आहे. यावेळी इतरही मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार असलेल्या अधिकारान्वये ३ मे रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत शहरातील साळवी स्टॉप, जेल नाका, गोगटे कॉलेज, भाट्ये बीचपर्यंतचा रस्ता हा दोन्ही बाजूने ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर होण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसेच वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाकडून करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.



