रत्नागिरीतील श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळाचा मुंबईत नमनाचा कार्यक्रम

रत्नागिरी : श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी या मंडळाचा पौराणिक गण “सिंधुरासुराचा वध” हा नमनाचा कार्यक्रम १८ जानेवारी २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर (मुंबई) येथे आयोजित केला आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबई कार्यकारणी मंडळ तळेकांटे (रेवाळे वाडी, ता. संगमेश्वर) यांच्या वतीने खास प्रेक्षकांनी लोकप्रिय आणि बहुचर्चित असलेल्या श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी मंडळाचा पौराणिक गण “सिंधुरासुराचा वध” हा नावाजलेला नमनाचा कार्यक्रम मुंबई रंगमंचावर आयोजित केला आहे. नटखट गवळणींचा सुंदर नृत्याविष्कार, मावशीची धमाल आणि श्री कृष्ण लीला यांनी सजलेले हे नमन असून, याचे दिग्दर्शन मनोज घवाळी यांनी केले आहे. शाहीर कुमार अमित डांगे यांनी याची निर्मिती केली असून, त्यांच्याच सुमधुर स्वरात आणि रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गाजत असलेले हे बहुरंगी नमन आहे.
नमनाच्या तिकीटासाठी वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे अथवा अजित रेवाळे (7977149550), ज्ञानेश्वर रेवाळे (8655760702) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



