एस एम जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कडून रक्तदान
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे नवनिर्माण शिक्षण संस्था आणि रत्नागिरी जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवनिर्माण शिक्षण संस्थेकडून विविध महाविद्यालयाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
दरवर्षी 12 जानेवारी रोजी रक्तदान स्वयं शिबिराचे आयोजन करून रक्तदान केले जाते. परंतु रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे वाढत्या रुग्णांची संख्या आणि त्या ठिकाणी निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे करण्यात आलेल्या मागणीला साथ देत नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज Pada फिजिओथेरपी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 24 बाटल्यां रक्त संकलन करण्यात आले.
याप्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये विद्यार्थी रक्तदात्यांना उदबोधित करताना रक्ताचे महत्त्व पटवून दिले. यावेळी संचालिका ऋतुजा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. अनघा शेळके, डॉ. बिवलकर, प्रा. सुकुमार शिंदे जिल्हा रुग्णालयाचे प्राची जाधव, स्वेता चव्हाण, डॉ. अबू अत्तार,डॉ. शिवरंजनी जगताप, भारती भोसले, चंद्रकांत कातकडे, इरम काझी, दीप्ती जाधव, चाटे, बारगुडे, वाडेकर आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले



