मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

नवनिर्माण हाय सीबीएसई स्कूलमध्ये इन्वेस्टीचर्स सेरेमनी (पदग्रहण सोहळा) साजरा 

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवननवनिर्माण हाय इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2026 -27 चा इन्वेस्टीचर्स सेरेमनी (पदग्रहण सोहळा) अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात नवनियुक्त विद्यार्थी संसदेच्या सदस्यांनी आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भावी पिढीमध्ये नेतृत्व गुण विकशीत करणे आणि जबाबदार नागरिक बनवणारा हा एक भव्य आणि प्रेरणादायी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

गुणवंत विद्यार्थ्यांना औपचारिकपणे त्यांचे पद बहाल केले गेले. आणि शाळेच्या शिस्तीचे व मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येते. नवीन नियुक्त झालेले विद्यार्थी प्रतिनिधी अतिशय शिस्तीत मार्च पास करत मंचावर आले. प्रमुख अतिथी डॉ. संजय गवाळे, प्रज्ञा झारापकर, सीमा हेगशेटे आणि शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांचे मानाचे बॅच आणि साशे लावले गेले. तसेच त्यांच्या हाऊसचे ध्वज गेल्या वर्षीच्या हाऊस कॅप्टनने नियुक्त झालेल्या कॅप्टन कडे सुपूर्त केले. या सोहळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे सर्व नवीन नियुक्त झालेल्या प्रतिनिधींना नियमांचे पालन करण्याची आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची आणि शाळेचा नावलौकिक वाढविण्याची शपथ दिली गेली.

या सोहळ्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थी

विद्यार्थी अध्यक्ष – साहिल इसाफ 

हेड बॉय  – राजवर्धन पाटील 

 हेड गर्ल  –  अफरा डिंगणकर 

नवनियुक्त चार हाऊस ची नावे

विस्डम हाऊस, कॅप्टन अपूर्वा धोपटे,

व्हाईस कॅप्टन – अवेज पांगारकर, 

हार्मनी हाऊस कॅप्टन –  सिया गजरा,

व्हाईस कॅप्टन –  अतिफ शेख 

करेज हाऊस कॅप्टन – रुद्र थुळ 

व्हाईस कॅप्टन आयुशी सिंग, इंटिग्रिटी हाऊस कॅप्टन तीर्था नाखरेकर, वाईस कॅप्टन तेजश्री चौगुले,

सांस्कृतिक विभाग  कॅप्टन –  श्रावणी गुरव,

डिसिप्लिन कॅप्टन – स्वरा मोहिते, 

स्पोर्ट्स कॅप्टन –  दिवेश चव्हाण  इत्यादी मुलांची निवड करण्यात आली.

या सर्व मुलांना पुढील वाटचालीसाठी संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्रज्ञा झारापकर , आणि सर्व शिक्षक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button