रत्नागिरी जिल्हा वृत्त

पूज्य गांधी स्मरणिकेचे प्रकाशन

गांधारेश्वर,महात्मा गांधी रक्षाकलश समाधीला 75 वर्ष निमित्त

चिपळूण : गांधारेश्वर येथील महात्मा गांधी यांच्या रक्षाकलश समाधीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार शेखरसर निकम, चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, आठल्ये-सप्रे कॉलेजचे (देवरूख) माजी प्राचार्य सुरेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते युवराज मोहिते, पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस व्यासपीठावर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जाफर गोठे, सचिव सुनील खेडेकर, कोषाध्यक्ष मंगेश वेस्वीकर, सदस्य लियाकत शाह, सई वरवाटकर, दीपक महाडिक व इतर कार्यकर्ते, गांधीप्रेमी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button