मुख्य बातमीशैक्षणिक

‘नवनिर्माण हाय’मध्ये फ्रेशर्स डे

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये (सीबीएससी) नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज (२ जुलै) फ्रेशर्स डेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते बारावी या वर्गांत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले.

फ्रेशर्स डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात गाणे सादर करताना मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील

यावेळी संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील हे क्षण आयुष्यात परत अनुभवायला मिळत नसल्याने याचा पुरेपूर आनंद घ्या असे सांगितले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील दडलेले गुण समोर येतात, तसेच स्टेज डेअरिंग येते आणि मुलांचा आत्मविश्वासही वाढत असल्याचे ते म्हणाले. सौ. हेगशेट्ये यांनी मुलांनी सादर केलेल्या नृत्य, गाणी, कथा यांचे कौतुक केले. यावेळी मुलांबरोबरच मुख्याध्यापक डॉ. पाटील यांनीही आपले कलागुण सादर केले. त्याला विद्यार्थ्यांनी विशेष दाद दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button