मुख्य बातमी

गप्पा-टप्पा समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील आणि विजेता मोर्ये आणि विजय मोर्ये यांच्या गप्पा-टप्पा या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन शहरातील जेल रोड परिसरातील ओम इव्हेनु बिल्डिंग येथे नुकतेच करण्यात आले. एमएसडब्ल्यू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विजेता मोर्ये यांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर समुपदेशन केले जाणार आहे.
उद्घाटनप्रसंगी वेल्थजेनिक एज्युकेशनचे नॅशनल डिप्लोमॅट डॉ. अरविंद आहेर, सौ. राधा आहेर, युनियन बँकेच्या रत्नागिरी शाखेचे मुख्य प्रबंधक रावसाहेब सराटे, वेल्थजेनिक एज्युकेशनचे ग्लोबल प्रमोटर्स आनंद विलणकर, रिजनल प्रमोटर्स टी. एन. शिवगण, इंटरनॅशनल मेमरी अॅथलिट प्रकाश कारखानीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या माध्यमातून येथे आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक नियोजन, मेमरी एनहॅन्स, डान्स, झुंबा, डाएट, योगा, पब्लिक स्पीकिंग, व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे विविध अभ्यासक्रम वेल्थजेनिक एज्युकेशन या कंपनीमार्फत ऑनलाईन शिकवले जाणार असून, सोबतच एएआय, कोडिंग, डिजिटल मार्केटिंग हा ऑनलाईन अभ्यासक्रम पण उपलब्ध आहे.
या समुपदेशन केंद्रात सकारात्मक दृष्टिकोन, तणावसंबंधी, विद्यार्थी-पालक, शैक्षणिक, करियर, युवक-युवती, गरोदर माता, भावनात्मक मुद्दे, कौटुंबिक व वैवाहिक समस्या आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button