महाराष्ट्र राज्यमहिला जगतमुख्य बातमी

लाडक्या बहिण योजना: सप्टेंबरच्या हप्त्यासाठी शासन निर्णय जारी !

मुंबई :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने सप्टेंबर २०२५ च्या हप्त्याच्या वितरणासाठी हालचाली सुरू केल्या असून, सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाकडे ४१० कोटी रुपये वर्ग केले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच १,५०० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. या वर्गणीसंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने जारी केला असून, लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास फारसा विलंब होणार नाही.

महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ मध्ये ही योजना सुरू केली होती. त्यानंतर जुलै २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांची रक्कम पात्र महिलांना मिळाली आहे. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरच्या सुरुवातीला जमा झाला होता. आता सप्टेंबरचा हप्ता कधी येईल याकडे लाखो लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत. ४१० कोटी रुपयांच्या वर्गणीनंतर हा हप्ता लवकरच वितरित होण्याची अपेक्षा आहे. योजनेच्या अधिकृत पोर्टलनुसार, आतापर्यंत ९ हप्ते पूर्ण झाले असून, उर्वरित हप्त्यांसाठी प्रक्रिया सुरळीत चालू आहे.

ई-केवायसी प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करावी

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सरकार या निकषाची पडताळणी करण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यात आधार कार्डची तपासणी, तसेच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी समाविष्ट आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ई-केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर ही प्रक्रिया ऑनलाइन करता येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button