खेडचे सुपुत्र उद्योजक विजयकुमार भोसले यांचा आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरव

खेड : तालुक्यातील खोपी गावचे सुपुत्र, मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक विजयकुमार गणपतराव भोसले यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा भव्य सोहळा ऍंट्रिया हॉल स्टेशन रोड, ताराबाई पार्क जवळ, कोल्हापूर येथे रंगला.
दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविले जाते. विजयकुमार भोसले यांनी शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. पद्मजा खटावकर, कार्यक्रमाचे संयोजक विक्रम बसवंत शिंगाडे यांनी श्री. भोसले यांनी गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेली मदत, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे सांगतानाच भोसले यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. श्री. भोसले हे मुंबईतील अनेक स्थानिक मंडळाचे सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल खोपी (मुंबई) चे माजी अध्यक्ष आहेत.
विजयकुमार भोसले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



