तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लबच्या तायक्वांदोपट्टूंचे सुयश

रत्नागिरी : गणराज तायक्वांदो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कररा व क्लबचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सौ. रजंना मोडूळा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात झाली.
यामध्ये गणराज क्लबच्या खेळाडूंनी यश मिळविले आहे. यशस्वी खेळाडूंची असे : येलो बेल्ट- नीरज प्रशांत मकवाना, त्विषा वक्रतुंड शेट्ये, दृष्टी केतन शेट्ये, मथंन वैभव दर्जी, सनोबर मोअज्जम फणसोपकर, तुशांत ओंकार विलणकर, मथंन राहुल कोतवडेकर, इफरा अखलाक खान, श्रेया महादेव पाटील, युमना सर्फराज संदे. ग्रीन बेल्ट- जैनब वसिम काझी. ग्रीन वन- तीर्था प्रशांत मकवाना, अनया अभिज्ञ वणजू. ब्ल्यू- सोनाक्षी अंरविद यादव, फातिमा मुबशर फडणीस. ब्ल्यू वन- दुर्वा मंदार हातिसकर, समर्थ सुशांत विचारे, विहान संकेत घाग. रेड – ओम अमोल झगडे.
या सर्व यशस्वी गणराज तायक्वांदोपट्टुंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, गणराज क्लबच्या पदाधिकारी,उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, खजिनदार नुतन कीर, पालक वर्ग, टेक्निकल प्रमुख-परेश मोडूळा, अनिकेत पवार, क्लबच्या सदस्या साक्षी मयेकर, पूजा कवितके, कनिष्का शेरे, सिनियर खेळाडू आद्या कवितके, स्वानंद तुपे, त्रिशा मयेकर, गौरी विलणकर, डॉ. मयुरेश नडगिरी, साहील शिवगण, आदिती शिवगण आदींनी शुभेच्छा दिल्या.



