मुख्य बातमी
विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन रद्द

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. शासन परिपत्रक क्र. प्रसुधा २०११ /प्र.क्र.१८९/११/१८8- अ, २६ सप्टेंबर २०१२ मधील परिच्छेद ५.७ नुसार, आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये अशा सूचना आहेत.
त्यानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू झाली आहे. त्यामुळे माहे नोव्हेंबर २०२४ चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होणार नाही, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे तहसीलदार (सर्वसाधारण) बजरंग चौगुले यांनी कळविले आहे.



