क्रीडामुख्य बातमी

तिसरी श्रीमंत पेशवाई चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २ आणि ३ फेब्रुवारीला

रत्नागिरी : श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ३ री श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ राधाकृष्ण मंदिर, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी येथे २ आणि ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटात होणार आहे. यासाठी गटानुसार प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. या वर्षातील ही सातवी स्पर्धा आहे. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवारी (२९ जानेवारी) सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासहित तालुका प्रतिनिधीकडे द्यावात. पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत. कुमार, कुमारी, किशोर व किशोरी गटाचे सामने २ फेब्रुवारी रोजी खेळविले जातील.

तालुका प्रतिनिधी असे :

गुहागर- प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी- विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख- राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण- प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर- मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा- मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड- योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर- मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली- माधव शेट्ये (९२०९७०९७९२).

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी, तर स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन बंदरकर हे काम पाहतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन स्पर्धा आयोजक मारुती आळी हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश संसारे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांच्यासह श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळीचे सदस्य मिलिंद दळी, मिलिंद शेरे, परिमल खेडेकर, साहिल गांधी, ओंकार शेरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button